‘रिझिलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हीजन २०४७’ शिखर संमेलन नवी दिल्ली, दि. १७ : मानवी विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र बिघडले असून पर्यावरणात बदल होत आहेत. एकविसाच्या शतकात ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. ‘रिझिलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हीजन २०४७’ मध्ये जे विचारमंथन होत आहे, ते प्रत्यक्ष स्वरुपात देशाच्या कानाकोपऱ्यात जनचळवळीच्या […]
Month: November 2024
वस्तू व सेवाकर चोरी प्रकरणी एकाला अटक
मुंबई, दि. १७ :- बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, तसेच रू. ८ कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या १८ कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास […]
दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार
जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा दावोस, दि. १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक […]
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० केंद्रीय मंत्रिमंडळाच्या २९ जुलै, २०२० रोजीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० हे मुख्यत : ५ स्तंभावर आधारीत आहे. १ ) Access ( सर्वांना सहज शिक्षण ) २ ) Equity ( समानता ) ३ ) Quality ( गुणवत्ता ) ४ ) Affordibility ( […]
विविध देशांच्या मुंबईतील राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
मुंबई, दि. १६ : विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ काॅन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्याचे युग हे […]
सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन, शाश्वत व्यवसायासाठी राज्यात आता महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रम
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय स्टार्टअप दिनी उपक्रमाचा प्रारंभ मुंबई, दि. १६ : स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास […]
डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबईत डिजिटल बालवाडीचे उद्घाटन मुंबई, दि. १६ : डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या उद्घाटन कार्यक्रमात […]
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
मुंबई, दि. १६ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ,शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत त्यासाठी […]
ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव ल. गो. ढोके यांनी केले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात ७ डिसेंबर हा दिवस ‘ध्वज दिन’ म्हणून […]
पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी
मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहे. दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवात प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना […]