ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जी२० बैठक; परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

पुणे, दि.१६ : ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; सुमारे १० हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न दावोस दि. १६ : स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये  सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. श्री. सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

केंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही

किसान क्रेडीट कार्ड, मासेमारांसाठी पायाभूत विकास, जुन्या जेट्टींचे निराकरण, अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा नवी दिल्ली, दि. १६ : महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर सागरी किनाऱ्याची परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राच्या सागर परिक्रमा अभियानात महाराष्ट्र सर्वतोपरी सहकार्य करेल आणि सहभागी होईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) २०२३ ; शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा

भारत सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबवत आहे. क्षेत्राची सध्याची गरज लक्षात घेऊन NLM योजना २०२१-२२ पासून सुधारित आणि पुन्हा संरेखित करण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) च्या सुधारित योजनेचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रति प्राणी उत्पादकता वाढवणे आणि अशा प्रकारे छत्री योजना विकास कार्यक्रमांतर्गत मांस, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयचे माजी विद्यार्थी गौरव हिचामी याने पटकाविला महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक

५ ते १२ जानेवारी दरम्यान पुणे येथील बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा माजी विद्यार्थी गौरव हिचामी यांनी ४८ कि. वजन गटामध्ये वुशू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. राज्य भरातून आलेल्या स्पर्धकांपैकी वूशु स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये नागपूर व मुंबई येथील स्पर्धकाला २.५ मिनिटांच्या कालावधी मध्ये नमवून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मोफत नर्सरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

नागपूर :-महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंध संस्थान नागपूर येथे तिन दिवसीय निवासी नर्सरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातुन प्रशिक्षणार्थी आले होते.सदर प्रशिक्षणामध्ये फळ रोपे, भाजीपाला रोपे तयार करणे, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शांतिग्राम येथे कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अल्पसंख्याक विकासविषयक विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या विविध विभागांना सूचना – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य कुमारी सय्यद शहजादी

मुंबई, दि. ११ : राज्यातील वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करणे, उर्दू अकादमीमार्फत मुशायऱ्याचे आयोजन करणे याबरोबरच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सय्यद शहजादी यांनी दिली.  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल – पोलीस महासंचालक रजनिश सेठ

३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुणे, दि. ११: राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. […]