मुलचेरा:-तालुक्यातील विवेकानंदपूर येथे भव्य क्रीडा संकुल चे बांधकाम करण्यात आले.नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर,तहसीलदार कपिल हाटकर,जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंधल,तालुका क्रीडा अधिकारी भास्कर गठाळे,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,गटविकास अधिकारी एल बी जुवारे,गटशिक्षणाधिकारी […]
Month: November 2024
रोटी फाउंडेशन चा आधार दुर्गम भागातील मुलीला यशाचे शिखर गाठण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर मुलीला दिला उच्च शिक्षणासाठी पाच लाखाचा चेक
अतिदुर्गम भाग सिरोंचा तालुक्यातील रेगुंटा येथील किरण कुर्मावार हिला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे जायचे होते तिची हालाखीची परिस्थिती आहे ही स्वतः आपल्या वडिलांसोबत ड्रायव्हरकी करून उदरनिर्वाह करीत आहे यातच तिने उस्मानाबाद इथून उच्च शिक्षण घेतले आहे पुढील शिक्षणासाठी तिला लंडन येथे जायचे आहे करिता ही बातमी न्यूज चैनल वर आली आणि ही बातमी बघून रोटी […]
कोपरअल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन
मुलचेरा येथील स्व. श्री. मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उदघाटन श्री. मनोजभाऊ बंडवार उपसरपंच ग्रा. पं. कोठारी यांच्या हस्ते दिनांक 27/02/2023 रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. एल. ढेंगळे उपस्थित होते. प्राचार्य ढेंगळे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाल, […]
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन
अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथे जिल्हा परिषद 15 व्या वित्त निधी अंतर्गत पेरमिली येथील वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद ( Ajaykankdalwar ) अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.. भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष बोलत होते की पेरमल्ली हे गाव अतिदुर्गम नक्षल ग्रस्था भाग असून विध्यार्थ्यांना अभ्यास करण्या साठी बसण्या योग्य जागा […]
राज्यपालांना विधानभवन येथे मानवंदना
मुंबई दि.२७ : राज्यपाल रमेश बैस यांचे विधानमंडळ येथे आगमनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्याच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता – राज्यपाल रमेश बैस
शेतकरी कर्जमुक्ती, आपला दवाखाना योजना, रोजगार मेळावे, पायाभूत सुविधांची निर्मिती यासह अनेक योजनांना राज्यात गती अर्थसंकल्पीय अधिवेशन मा.राज्यपाल अभिभाषण : मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून १ लाख २५ हजार रोजगार निर्मितीसाठी ४५ कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या […]
मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानमंडळातील ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ कार्यक्रमास भरभरुन प्रतिसाद मुंबई, दि. २७: “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून मराठी बोलले, लिहिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘मराठी भाषा […]
मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्रदान मुंबई, दि. २७ : जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी जनांना एका धाग्यात जोडण्याचे काम माय मराठी करते. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, माणुसकी शिकवते तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते. हे सर्व गुण मराठी भाषेत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनीचित्रमुद्रीत संदेशाद्वारे शुभेच्छा देताना केले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते […]
ग्रामीण भागात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन हे अभिमानास्पद:भाग्यश्रीताई आत्राम
*नृत्य स्पर्धेला रसिकांनी दिला भरभरून प्रतिसाद* अहेरी:- शहरी भागात मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांचे आयोजन केले जातात. मात्र, ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा घेणे हे अभिमानास्पद असल्याचे मत माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले.रविवार (26 फेब्रुवारी) रोजी कमलापूर येथे अखिल नाट्य, क्रीडा, कला व सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात […]
विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक
मुंबई दि. २७- अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२-३ साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली. विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका सभापती म्हणून नेमणूक करण्यात आली. दरम्यान, विद्यमान विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधानसभा सदस्य सर्वश्री जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला.