मुंबई, दि. ६ : ताडदेव येथील रहेजा एक्सलस यांनी रस्ता गेट लावून बंद केलेला आहे, तो रस्ता मोकळा करावा जेणेकरुन दादरकर कंपाऊंडला रस्ता उपलब्ध होईल आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. मंत्रालय येथील दालनात ताडदेव येथील नागरिकांच्या रस्त्याच्या समस्येसंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त शरद निवृत्ती […]
Day: November 23, 2024
शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. […]
आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 6 : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात […]
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्ह आणि शुभंकरचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते अनावरण
लातूर, दि. 06 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकरचे ( मस्कॉट) आज क्रीडा मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुंबई येथे अनावरण झाले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव […]
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना
मुंबई, दि. 6 : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या. विभाग आणि जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामकाजासंदर्भातील ऑनलाईन आढावा बैठक मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे […]
भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 6 : मंगेशकर कुटुंबियांनी संगीताची सेवा करून सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. या कुटुंबातील भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे अलौकिक देणं आहे. त्यांच्या स्मृतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यातर्फे आज सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची ७ व ८ फेब्रुवारीला मुलाखत
मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूजऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. ८, बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल. वंध्यत्व काय आहे, यावर असणारी […]
राजभवनात ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ रेखाचित्र कार्यशाळेचा समारोप
मुंबई, दि. ६ : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाला. राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पाहिली व त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी काढलेली छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील, […]
बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे येथील एमसीएचआय-क्रेडाई आयोजित गृहबांधणी प्रकल्प प्रदर्शनास मुख्यमंत्री यांची भेट ठाणे, दि. ६ (जिमाका) : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी […]