शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर […]
Day: November 23, 2024
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा !
युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भेंडी बाजार येथे प्रकल्पाच्या सेक्टर ४चे भूमिपूजन मुंबई, दि 7:- स्मार्ट सिटींच्या उभारणीद्वारे लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत असून मुंबईतील भेंडीबाजारसारख्या गजबजलेल्या भागात आकारास येत असलेला सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा (SBUT) गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भेंडी बाजार येथे सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या गृहनिर्माण प्रकल्प सेक्टर 4 […]
कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांचा वरळी येथील कोळी बांधवांच्यावतीने नागरी सत्कार मुंबई, दि. 7 : कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा नेव्हीगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने […]
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
मुंबई, दि. ७ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी […]
अल्पसंख्याक लाभार्थींना लघु व्यवसायाकरिता मुदत कर्ज योजनेसाठी ४१७ अर्ज प्राप्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार मौलाना आझाद महामंडळाच्या योजनेला प्रतिसाद मुंबई, दि.७ : राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत लघु व्यवसायासाठी राबविण्यात येत असलेल्या मुदत कर्ज योजनेकरिता अर्ज करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीदिनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आवाहन केले होते. त्यानुसार 18 जानेवारी २०२३ पर्यंत सर्व […]
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई, दि. 7 : लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील कामे. त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारण्याकरीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी बोलत होत्या. तहसीलदार सचिन […]
राजपत्रित अधिकारी महासंघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आज उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्रालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह राज्यभरातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी महासंघाच्या वतीने उभारण्यात येणार असलेल्या कल्याण केंद्राच्या कामासाठी उल्लेखनीय निधी संकलन […]
पोंभूर्णा (चंद्रपूर) येथील अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 7 : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी फेरआढावा घेऊन अतिवृष्टी संदर्भात शासनाकडे नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात 2022 मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची […]
राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणांना संधी; मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. ७ : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]