ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य काढलेल्या बाईक रॅलीत गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतला सहभाग

शिवजन्मोत्सव समिती अहेरीच्या वतीने हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शिवजयंती निमित्य महाराजांचे पूजन केले. त्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीत आणि भव्य बाईक रॅली काढून धूमधडाक्यात शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अहेरी नगरी दणाणून निघाला.! शिवजयंती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तानाजीभाऊ जाधव यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट!

टायगर ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रीय डॉ.तानाजीभाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असतांना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ.तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी टायगर ग्रुप व भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय रिझर्व बँक अंतर्गत आंबटपल्ली येथे लिंकेज कॅम्प

मुलचेरा:भारतीय रिझर्व बँक व बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने मनिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर मुलचेरा अंतर्गत आंबटपल्ली जि. प शाळा या ठिकाणी लिंकेज कॅम्प घेन्यात आला. या कॅम्प ला महत्त्वाच सहकार्य जिल्हा को. ऑप. बॅंक मुलचेरा यांच होत. कार्यक्रमाचे ऊद्घाटक मा. वाय. बि. जेट्टिवार सर GDCC ( BM) यांनी तळागाळातील लोकांना आर्थिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उन्हाळी हंगामातील पीक पाहणी करण्याची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर उपलब्ध !

महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी ॲप मध्ये उन्हाळी व संपूर्ण वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध आहे यापैकी आपणास हवा असलेल्या हंगामातील एक पर्याय निवडून आपली पीक पाहणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत मोबाईल ॲप द्वारे रब्बी हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा अंतिम दिनांक होता. तसेच 16 फेब्रुवारी पासून मोबाईल ॲप द्वारे उन्हाळी हंगामाची पीक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ या योजने अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील अर्जदारांकडुनऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या महामेष संकेतस्थळावरुन तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन महामेष App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मार्कंडादेव येथे भारत सरकारच्या विविध योजनांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार उद्घाटन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय,पुणे व क्षेत्रीय कार्यालय वर्धाचा उपक्रम गडचिरोली : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय, पुणे, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, गडचिरोली व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने दिनांक १७ फेब्रुवारी पासून २१ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मुलचेरा येथे कृषी विभाग मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य प्रचार रॅली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रसार प्रसिद्धी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या वतीने  आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत गावोगावी प्रचार प्रसिद्धी रॅली पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून जनतेमध्ये ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा इत्यादी तृणधान्याबाबत व त्यातील पोषक मूलद्रव्याबाबत जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये मुलचेरा व कोपर आली येथून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने  निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे, दि. १५ – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. १५ जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत( काऊंसिल जनरल) फुकाहोरी यासुकाटा यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई काऊंसिल जनरल कार्यालयातील कानेको तोषिहिरो, मोरी रेईको उपस्थित होते. जपान आणि महाराष्ट्राचे उद्योगांसह कला, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आगामी काळात हे संबध अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. […]