प्रशिक्षण संस्थांसाठी हेल्पलाईन मुंबई, दि. 8 : कोकण विभागातील कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांसमवेत (VTPs/TPs/TCs) आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संवाद साधला. कौशल्य विकास विभागामार्फत नोंदणीकृत असलेल्या या प्रशिक्षण संस्था आणि विभागामध्ये समन्वय साधणे, अडीअडचणी दूर करणे यासाठी यापुढील काळात दर २ महिन्यांनी या संस्थांचा जनता दरबार घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा […]
Month: November 2024
कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांच्याशी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा मुंबई, दि. 8 :- ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यापार व आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली. कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करण्यावर भर देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य […]
मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या न्यूज स्टेट महाराष्ट्रतर्फे ‘संकल्प महाराष्ट्र’ परिसंवादाचे आयोजन मुंबई, दि. 8 : मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्चून काँक्रिट रस्त्यांचे काम सुरू आहे. सर्वत्र सुशोभीकरण सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे, तर कोस्टल रोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून नागरिकांना […]
कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
राज्यस्तरीय कामगार केसरी, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ विजेत्यांना बक्षीस वितरण मुंबई, दि. ८ : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कामगारांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना येथे आयोजित […]
देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्तवाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज […]
वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार
मुंबई ,दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ म्हटले जाणार असल्याची […]
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ
मुंबई, दि. 8 :- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे […]
अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि […]
ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर मुंबई दि 8 : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे […]
शिक्षकांच्या मानधनात वाढ येथे पहा सुधारित मानधन
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर […]