मुंबई, दि. 14 : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा […]
Day: November 23, 2024
महाज्योती मार्फत मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या […]
नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारला बे मुदत संप
एकच मिशन जुनी पेंशन चामोर्शी :- “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” “एकच मिशन जुनी पेन्शन” हा नारा यावेळी देण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांनी जे 2005 नंतर सेवेत कार्यरत आहेत परंतु सरकारने अजूनही त्यांना जुनी पेन्शन लागू केलेली नाही. यावेळी राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला दोष देत त्यांचा धिक्कार केला. व पुढे […]
विर बाबुराव शेडमाके यांचे जन्मगाव किष्टापूर (दौडगीर) येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्मारक बनविणार:- राजे अम्ब्रीशराव आत्राम
अहेरी येथील सामूहिक विवाह सोहळ्यात ६१ आदिवासी जोडपे विवाहबद्ध, लोकांची तुडुंब गर्दीआदिवासी समाजाचे प्रेरणास्थान शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीचे औचित्य साधून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी येथील ऐतिहासिक हॉकी ग्राऊंड येथे सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाले, ह्या दिमाखदार विवाह सोहळ्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील […]
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुलचेरा बेमुदत संप
मुलचेरा :- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज सरकारी कार्यालयात मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्यातील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले आहे. आज सकाळी तालुक्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. […]
मराठी नाटकाला दिशा दाखवणारा समीक्षक हरपला -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ : कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने मराठी नाटक समृद्ध करणारा समीक्षक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस संदेशात म्हणतात की, श्री. नाडकर्णी यांनी नाट्य समीक्षेच्या माध्यमातून मराठी नाटकाला दिशा दाखवण्याचे कार्य केले. एक संवेदनशील लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम माणूस आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात […]
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
मुंबई : दि. १२: देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Governor Ramesh Bais pays tribute to Y B Chavan on 110th Birth Anniversary Mumbai: Date 12-Maharashtra Governor Ramesh Bais […]
नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१२: शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’च्या पुरस्कार वितरण […]
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील […]
जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची […]