ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मुंबई, दि.14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले.             यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील  जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील २७ लाख नागरिकांना लाभ देणारा ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्री

एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५  हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस

अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.             महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह […]