ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमात दाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १९ : ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये  मांडल्या. स्थानिक प्रशासनाने १५०० तक्रारी पडताळून घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

दिनांक 19 एप्रिल 2023 ला स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशालेकरिता डॉ. विवेक जोशी सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविदयाल्याचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल उपस्थिती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

प्रथम क्रमांकाचे तीन तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार नवी दिल्ली, दि. १७ : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी,  कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत मुंबई, दि. १८ : कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या  दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १८ :- राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. केंद्र शासन पुरस्कृत ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२३ ते २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘अभिरूप युवा संसदेच्या प्रतिनिधींनी साधला राज्यपाल रमेश बैस यांच्याशी संवाद’

उत्तम संसदपटू होण्यासाठी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची राज्यपालांची सूचना मुंबई, दि. १८ : भारत आज जगातील सर्वाधिक युवा देश म्हणून उदयास आला आहे. आगामी काळात सरकार तसेच लोकशाही संस्थांचे नेतृत्व युवक-युवतींना करावे लागणार आहे. या दृष्टीने युवकांनी संसदीय लोकशाही समजून घेणे आवश्यक आहे. चांगला संसदपटू होण्यासाठी सभागृहात जनतेचे कोणते प्रश्न उपस्थित करावे तसेच ते प्रभावीपणे कसे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे:भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न सिरोंचा:- शासन आपल्या दारापर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ महाराजास्व अभियानातून दिल्या जात आहे. हे अभियान सामान्य जनतेच्या हिताचे असून नागरिकांनी विविध योजनाबाबत माहिती जाणून घेऊन प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सिरोंचा तालुक्यातील पिरमीडा येथे तहसील कार्यालयामार्फत 18 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गोमणी येथे दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन

मुलचेरा-: तालुका महसूल प्रशासन च्या वतीने गोमणी येथे भगवंतरावं माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अल्पभुधारक प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, भूमिहीन दाखले, उत्पन दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड, राशन कार्ड, जेष्ठ व्यक्ती प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण होणार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महागाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते १५ शिलाई मशीन वितरण

राजेंनी डीजेच्या तालावर धरला ठेका! अहेरी तालुक्यातील महागाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सहभागी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच यावेळी आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू महिलांना १५ शिलाई मशीन वाटप केले.याप्रसंगी उपस्थित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मोठी बातमी! – आता PF रिजेक्शनचं टेन्शन नाही, झटपट खात्यात जमा होतील पैसे

केंद्र सरकारने ईपीएफओला निर्देश दिले आहेत की, PF क्लेम फेटाळताना सर्व उणिवा एकाच वेळी अर्जदाराला सांगाव्यात, जेणेकरून दावा पुन्हा पुन्हा भरावा लागणार नाही आणि अर्जदाराला अडचणीतून वाचवता येईल. पहा आणखी काय सांगितले सरकारने  तसेच ग्राहकांना त्यांचे दावे लवकर मिळावेत, त्याचबरोबर कामगार मंत्रालयाने ईपीएफओला दिलेल्या निर्देशांनुसार जर अर्ज करणाऱ्या सदस्याचे तपशील डेटा बेसमध्ये जुळत असतील तर […]