ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत (आज दु. 1 वाजेपर्यंत मिळालेल्या माहीतीनुसार) 261 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ओडिशातील बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोलकाता-चेन्नईकडे जाणारी […]