मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात […]
Day: November 23, 2024
पीएम किसानचा चौदावा हप्ता हवाय; मग लगेच केवायसी करा केवायसी केली नसेल तर मिळणार नाही योजनेचा लाभ किसान योजना
मुलचेरा:- शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाभार्थींना केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी सेतू केंद्र, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून किंवा पीएम किसान अपच्या माध्यमातून ई- केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन तालुका कृषी […]
राज्य सरकारची मोठी कारवाई! राज्यातील 1.27 लाख रेशन कार्ड केले रद्द
▪️राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ योजनेअंतर्गत डुप्लिकेट शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. राज्यात मे महिना अखेर 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत. छाननीनंतर यातील 1 लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक 24 हजार 821 रेशनिंग कार्ड ही […]
तहसीलदार उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – income certificate
आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील दाखले घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे :- १ ) रहिवाशी स्वंयघोषणापत्र २) उत्पन्नाचा पुरावा तलाठी उत्पन्नाचा दाखला तलाठी उत्पन्न दाखला ,अहवाल वेतन मिळकत असल्यास फॉर्म नं १६ आयकर विवरण पत्र निवृत्तीवेतनधारकांना साठी बँकेचे […]
पालकांनो उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र काढले का? लगबग वाढली : शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता
गडचिरोली : इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये प्रमाणपत्र व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग लागली आहे. विशेष म्हणजे, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर तहसील कार्यालयात तसेच सेतू केंद्रात हेलपाटे मारत आहेत. इयत्ता दहावी बारावीनंतर विद्यार्थी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश घेतात. यासाठी त्यांना […]