मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर मुंबई, दि. १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण […]
Day: November 23, 2024
बलशाली भारताच्या निर्मितीचा मार्ग वस्तू व सेवा करामुळे सुलभ होईल – राज्यपाल रमेश बैस
केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम मुंबई, दि. १ : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराचे ‘गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स’ असे वर्णन केलेले आहे. हा कर प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणाऱ्यांना बक्षीस देतो, तर अप्रामाणिकांना शिक्षा करतो. या करामुळे बलशाली आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग सुलभ बनेल, असे उद्गार राज्यपाल रमेश […]
पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न ठाणे, दि. २ (जिमाका) : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. […]
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजभवनात शपथविधी संपन्न; राज्यपाल रमेश बैस यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. […]
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस बुलढाणा, दि १ : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजा नजीक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात 25 जणांचा मृत्यू […]