मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे ४३० किमी अंतर सायकलने पूर्ण करणाऱ्या एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थी चमूला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नुकतेच राजभवन येथे कौतुकाची थाप दिली. तेरा सदस्यांच्या या सायकल अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल राज्यपालांनी दिव्यांग सायकलपटू मयूर दुमसिया यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्य […]
Day: November 23, 2024
मंत्रिमंडळ निर्णय
निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील […]
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेश स्थापना दिवस साजरा
राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत विविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी (दि. ३१) जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्र शासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात […]
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही […]
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिमाखात अनावरण ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते […]
मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता
नवी दिल्ली, 31 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ या मोहिमेत सुमारे सहा लाख गावांमधून अमृत कलशामध्ये आणलेली माती विशाल अमृत कलशात (भारत कलश) संग्रहित करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशी वनस्पतीं अमृत वाटिकेमध्ये समारंभपूर्वक आज स्थापित करण्यात आली. राजधानीतील कर्तव्य […]
ग्राहकांना पॉलिसीची मूलभूत वैशिष्ट्ये सांगणे विमा कंपन्यांना बंधनकारक
ग्राहकांना विमा कवचाची रक्कम, विम्यातून वगळलेल्या गोष्टी आणि दाव्यांची प्रक्रिया आदी मूलभूत गोष्टींची माहिती सहजसोप्या भाषेत देणे विमा कंपन्यांसाठी बंधनकारक होणार आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी नववर्षाच्या सुरूवातीपासून, म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने याबाबत सर्व विमा कंपन्यांना उद्देशून परिपत्रक काढले आहे. आधीच्या नियमांत सुधारणा करून नवीन नियमावली […]
केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे फायद्याची; 3 लाख रुपयांचं मिळणार अनुदान
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवित असतात. अशातच केंद्र सरकारने पीएम मत्स्य संपदा योजना राबवली आहे. मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारने या योजनेला ब्ल्यू रिव्होल्युशन असे नाव दिले आहे. […]