ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

मुंबई दि. २६ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार मुंबई, दिनांक २६ : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यस्तरीय 19 वर्षाखालील (मुली) कबड्डी स्पर्धेत सिरोंचा तालुक्यातील मुलींची निवड..! अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जाणाऱ्या कबड्डी खेळाडू मुलींना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत..!!

राज्यस्तरीय 19 वर्षाखालील (मुली) कबड्डी स्पर्धेत सिरोंचा तालुक्यातील मुलींची निवड..! अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जाणाऱ्या कबड्डी खेळाडू मुलींना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत..!! गडचिरोली:-जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या सिरोच्या तालुक्यातील मुलींनी कबड्डी स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्याच् नाव आज मोठं केलं आहे,आज संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात त्यांचं कौतुक होत […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गोमणीचे युवा नेते शुभम भाऊ शेंडे(बंटी भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप..!

गोमणीचे युवा नेते शुभम भाऊ शेंडे(बंटी भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप..! मूलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत सदस्य तथा युवा नेते शुभम भाऊ शेंडे(बंटी भाऊ) हे सामाजिक कार्यात असो वा एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला निस्वार्थी भावनेने मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण मूलचेरा तालुक्यात आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,दि.23 : वसमत (जि.हिंगोली) शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात वसमत शहरातील विविध विकास प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. बैठकीला आमदार चंद्रकांत नवघरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयांत ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविणारी मुंबई देशातली पहिली महापालिका ठरणार मुंबई, दि. २३ : मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपालांच्या हस्ते मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. २३ : राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत आपणांस भेटावयास येतात. त्यातील काहींना  तर हिंदी भाषा देखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग  कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात; हिंदी भाषेत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कांचनपूर येथील 20 युवा कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश..! भारत बिश्वास या कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत..!!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कांचनपूर येथील 20 युवा कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश..! भारत बिश्वास या कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत..!! मूलचेरा:- तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कांचनपूर येथे माँ काली माता पूजा महोत्सव निमित्ताने भेट देण्यासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे कांचनपूर येथे दौऱ्यावर आले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम महत्त्वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘कार्तिकी वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ या उपक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर, दिनांक 22:- वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातही पाणी साचत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय

एसटी बस स्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवणार शासकीय नोकऱ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली स्वाधारच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करणार दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. 22 : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी […]