(खासदार अशोक नेते यांची पत्रपरिषदेत माहिती) वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी यापूर्वी 322 कोटी रुपये मंजूर झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू आहे. राज्य सरकारकडूनही त्यांचा 50 टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी पत्रपरिषदेत सांगितले. संपूर्ण देशभरात […]
Day: November 23, 2024
हिंदूरजवळ पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
कांकेर-नारायणपूर-गडचिरोली या त्रिकोणी रस्त्याच्या पॉईटपासून वांगेतूरीपासून 7 किमी असलेल्या हिंदूर गावाजवळ आज 7 वाजताच्या सुमारास पोलिस-नक्षलवद्यांमध्ये चकमक झाली. प्राप्त माहितीनुसार, कांकेर-नारायणपूर-गडचिरोली या त्रिकोणी रस्त्याच्या पॉईटपासून वांगेतूरीपासून 7 किमी असलेल्या हिंदूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उभारलेल्या वांगेतूरी आणि गर्देवाडा पोलिस मदत केंद्राची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून बसले होते. सदर गोपनिय मिळालेल्या माहितीच्या आधारे […]
चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेट
Chandrababu Naidu-Amit Shah : तेलुगू देसम् पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष आंध‘प्रदेशात हातमिळवणी करणार असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंध‘प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबतच होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांनी […]
लोहखनिज वाहतुकीसाठी मुत्तापूर-वडलापेठ- वेलगूर- टोला- येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा- हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम ८४ किमीच्या विशेष खनिज वाहतूक मार्गाला शासनाची मंजुरी
लोहखनिज वाहतुकीसाठी मुत्तापूर-वडलापेठ- वेलगूर- टोला- येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा- हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम ८४ किमीच्या विशेष खनिज वाहतूक मार्गाला शासनाची मंजुरी गडचिरोली : जिल्ह्यातील लॅायड्स मेटल्स व एनर्जी लि.च्या कोनसरी येथील एकात्मिक पोलाद प्रकल्पासह राज्याच्या आणि देशाच्या इतर भागात लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी विशेष खनिज वाहतूक मार्गाची उभारणी केली जात आहे. त्यातील […]
गडचिरोलीत सावित्रीच्या लेकींसाठी येणार नव्या ५५ बसेस शासनाची मान्यता, मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बससेवा
ग्रामीण भागातील सर्वच मुलींना शिक्षण घेता यावे याकरीता गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जिल्हयाकरीता उपलब्ध बसेस, प्रत्यक्ष सुरू असलेल्या बसेसची संख्या आणि बसेसचे आर्युमान लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली जिल्हयासाठी 55 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील […]