गडचिरोली विधानसभा: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १०८ कर्मचाऱ्यांना बजावले नोटीस गडचिरोली: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे. गैरहजर राहिलेल्या १०८ कर्मचाऱ्यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी कारणे दाखवा नोटीस […]
Month: January 2025
सामान्य निवडणूक निरीक्षकांनी केली सोयी सुविधांची पाहणी
सामान्य निवडणूक निरीक्षकांनी केली सोयी सुविधांची पाहणी गडचिरोली:६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा(भा.प्र.से.)यांनी आज दिनांक ३०ऑक्टोबर २०२४ रोजी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील गडचिरोली येथील धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ९२ या दिव्यांग मतदान अधिकारी संचलित मतदान केंद्राला भेट देऊन सोयी सुविधांची व स्वच्छतेचे पाहणी केली. तसेच त्यांनी पारडी नाका […]
क्षेत्रीय अधिकारी, एसएसटी व एफएसटी प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार
महाराष्ट्र राजपत्रात अधिसुचना प्रसिध्द गडचिरोली, दि.30 : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसेच स्थायी निगराणी पथक (एसएसटी) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतची अधिसुचना महाराष्ट्र राजपत्रात प्रकाशित झाली आहे. निवडणूक प्रक्रियेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील क्षेत्रीय […]
निवडणूक निरीक्षकांकडून आरमोरी मतदारसंघाचा आढावा
भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्या अनुषंगाने ६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे भेट देऊन निवडणूकीसबंधाने पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, […]
निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रांना भेट
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा इव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल रूम, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्ष तसेच मतदान […]
उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲप
भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहेत. यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते, पण आता नवीन अॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि […]
जिल्ह्यात आज 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन अर्ज दाखल
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी गडचिरोली जिल्ह्यात आज 10 उमेदवारांकडून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले यात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन तर प्रा. रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला आहे. 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात सहा नामनिर्देशन […]
निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज गडचिरोली विधानसभा क्षेत्र: ईव्हीएम प्रात्यक्षिकासह पहिले प्रशिक्षण
गडचिरोली: ६८-गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे.२६व २७ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले. ६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व […]
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा १०० मिनिटांच्या आत मिळतो प्रतिसाद
विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, […]
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे. राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. […]