गडचिरोली दि.२८ : जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या ४५० किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचे काम येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. ऑप्टिकल फायबर दुरुस्ती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत श्री पंडा बोलत होते. महाआयटीचे महाव्यवस्थापक मकरंद कुर्तडीकर, सहव्यवस्थापक नवनितकुमार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सुनील मोकडे आणि स्टरलाईट […]