गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा;विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन

जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), तसेच सहायक कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी सिरोंचा तालुक्याला दिनांक २२ मे २०२५ रोजी दौरा केला. या दौऱ्यात तालुक्यातील विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक प्रशासन व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. दौऱ्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील टोकाचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

राज्यभरात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि त्यांच्या टीमचे जिल्हा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे तसेच, प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ यांच्याशी सुसंगत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोबाईल फोनचा वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन […]