मुंबई, दि. 8 – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H2OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता. […]
Day: June 14, 2025
‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा
सीएसएमटी स्थानकावरून सकाळी ६.३० वाजता होणार रवाना मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे. IRCTC, रेल्वे मंत्रालय, […]
‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’च्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन पुणे, दि. ८ : जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट मशिन्सच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि असे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिरुर औद्योगिक वसाहत […]
राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. 8 : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यादृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी […]
गडचिरोलीत ‘उद्योजक मदत कक्ष’ – औद्योगिकीकरणाला नवी दिशा
गडचिरोलीत ‘उद्योजक मदत कक्ष’ – औद्योगिकीकरणाला नवी दिशा गडचिरोली, दि. औद्योगिकीकरणाच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाद्वारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योजक मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयाने कार्यरत असलेला हा कक्ष जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याबरोबरच नवउद्योजक, गुंतवणूकदार यांना ‘एक खिडकी’ प्रणालीद्वारे सर्वसमावेशक सेवा […]
जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी
गडचिरोली, दि. ८ : जिल्हा परिषद गडचिरोली येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची संकल्पना साकार झाली असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे […]
ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक गडचिरोली, दि. ८ – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H२OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र […]
जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी
गडचिरोली, दि. ८ जून २०२५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमांतर्गत आय.आर.सी.टी.सी. व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सुरु होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातून निवडण्यात आलेले ५० शिवप्रेमी, युवक, विद्यार्थी व इतिहास प्रेमी आज मुंबईकडे रवाना झाले. या गौरवशाली यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर व […]