गडचिरोलीत २९ नोव्हेंबरला बहुजन विचारांचा जागर! ‘जनता अवेक इंडिया’ राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर होणार मंथन; राज्यभरातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचा सहभाग गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर : आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाच्या संवैधानिक हक्कांसह विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गडचिरोली येथे प्रथमच राज्यस्तरीय ‘जनता अवेक इंडिया’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. […]
Day: November 26, 2026
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण! मुंबईत हाय अलर्ट; समुद्रात नौदल आणि तटरक्षक दलाचा कडक पहारा
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण! मुंबईत हाय अलर्ट; समुद्रात नौदल आणि तटरक्षक दलाचा कडक पहारा संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला; अरबी समुद्रात गस्त तीव्र, मात्र सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे चिंता मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२६ : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली […]
जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णतः ऑनलाइन ‘सीसीव्हीआयएस’ प्रणालीद्वारेच अर्ज स्वीकारणार; शक्यतो ६० दिवसांत पडताळणीचे उद्दिष्ट
मुंबई, दि. २५ : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज केवळ ‘सीसीव्हीआयएस’ प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. घरबसल्या अर्जापासून प्रमाणपत्रापर्यंत सुविधा डॉ. बाबासाहेब […]
दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करा – मंत्री दादाजी भुसे दुष्काळग्रस्त ३१० तालुक्यांतील १५ लाख २८ हजार विद्यार्थ्यांना सुमारे ९६.२७ कोटींची परीक्षा शुल्कमाफी
मुंबई, दि. २५ : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे करावे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस शालेय विभागाचे प्रधान […]
पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने; नियोजनबद्ध शहरीकरणावर भर देण्याचे आवाहन मुंबई, दि. २५ : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, शाश्वत […]
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
सातारा, दि.२५: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ४२व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतिसंगम कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला विकासाचा मार्ग दाखविला आहे. स्व.अजित पवार यांनी नेहमीच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचारानुसार आपली वाटचाल ठेवली. शासनही त्यांच्या […]
पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार
कराड, दि. २५ : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. या दृष्टीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, आधुनिक साधने आणि व्यवसायाच्या […]








