मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे.
याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
