मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या कालावधीस पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याची विधानसभेत घोषणा केली. त्यामुळे नाशिक महापालिकेत कार्यरत असलेल्या जवळपास २५० लाडक्या भावांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या धर्तीवर लाडक्या भावांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ आणली होती. सहा महिन्यांसाठी युवकांना प्रशिक्षणासह वेतन देण्याची योजना होती. त्यात महापालिकेच्या माध्यमातून सुमारे अडीचशे प्रशिक्षणार्थींची महापालिकेच्या विविध विभागांत सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
