मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती, उमेद, शिक्षण विभाग, वन विभाग, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग अहेरी, एकात्मिक बालविकास विभाग, कृषी विभाग, बँक, संजय गांधी योजना विभाग, पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, पशुसवर्धन विभाग यांचे मार्फतीने शिबिरस्थळी स्टाल लावून विविध योजनाची माहिती तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व अर्ज स्वीकारण्याचे काम करण्यात येणार आहे. तरी गोमनी , आंबटपाली, गोविंदपूर व सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हाण मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील, गोमनीचे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले आहे.
Related Articles
मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट
वृत्तपत्र सृष्टीतील चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले गडचिरोली:- राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार रोजी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतले. एका दैनिक वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अरविंद खोब्रागडे यांचे आजाराने गुरुवार 9 नोव्हेबर रोजी नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन […]
राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुंबई, दि. १४ : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. […]
भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. २९ : “भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण भारत रशिया संबंधाला पूरक आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. रशिया-भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत […]