मुलचेरा:- तालुक्यातील धन्नुर आज दि.08/12/2023 रोज शुक्रवार ला कृषि विभाग च्या वतीने शेतकरी शास्त्र शास्त्रज्ञ संवाद व कापुस फरदड निर्मुलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पी. ए. बोथीकर ( किटक शास्त्रज्ञ KVK गडचिरोली ) यांनी ज्वारी, हरभरा, करडई व इतर रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ तंत्रज्ञानाविषयी व त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, ग्लायफोसेट तणनाशक वापराविषयी व त्याचे दुष्परीणाम याबद्दल मार्गदर्शन केले. कु. एस. एच. सुतार ( मंडळ कृषी अधिकारी मुलचेरा )यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी माहीती दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून श्री कालीदास कुसनाके ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास एस. एस. गरमळे कृषी पर्यवेक्षक रोहीत कोडापे कृषी सहायक व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
Related Articles
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
गडचिरोली, दि.02: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.इ यत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व दिनांक 01 […]
‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग – मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई, दि. 6 नोव्हेंबर 2022 : आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल 67 हजार 990 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत […]
राज्यात उद्या १२ नोव्हेंबरला एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत
मुंबई, दि.11 : राज्यातील उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठे, जिल्हा व तालुका न्यायालये तसेच न्यायाधिकरण येथे उद्या शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी […]