संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 31 जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार आहे.1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नियमित अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार जुुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर करेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारने उद्या सकाळी 11.30 वाजता संसद भवन परिसरातील ग्रंथालय इमारतीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. Budget session of Parliament अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जाणार आहे. यापूर्वीचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले होते. सुरक्षाव्यवस्थेच्या उल्लंघनाची गंभीर घटनाही त्यात घडली होती. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्याची परिणती दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या जवळपास दीडशे सदस्यांच्या निलंबनात झाली होती.
Related Articles
सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार; १४ लाखांहून अधिक नागरिकांचे तक्रार अर्ज निकाली
मुंबई, दि. ४: सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात १४ लाख ८६ हजार ९५९ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान, हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर […]
मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र […]
मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
मदत व पुनर्वसन विभागाची माहिती मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. ४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट […]