पीएम मोदींनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. एकाच दिवसात देशातील तीन सेलिब्रेटींना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे, असे मोदींनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री असो आणि आमदार असतानाही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच चालना दिली, असेही त्यांनी लिहिले आहे. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.
Related Articles
(MMS Mumbai) मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदाची भरती
(MMS Mumbai) Recruitment of ‘Skilled Craftsman’ at Mail Motor Service, MumbaiMinistry of Communication & IT Department of Post, India, Mumbai Mail Motor Service Recruitment 2022 (Mumbai Mail Motor Service Bharti 2022) for 09 Skilled Artisans Posts. जाहिरात क्र.: DMS/8/Tech Rectt./XXV/2022/318 Total: 09 जागा पदाचे नाव: कुशल कारागीर अ. क्र. ट्रेड पद संख्या 1 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 05 2 […]
उपवनसरक्षकांना काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे सीमांकान तयार करून स्वतः बाबूतोड करण्याकरीत तांत्रिक मदत देण्याबाबत निवेदन
भामरागड : आज उपवणरक्षक भामरागड वन विभाग भामरागड स्थित आलापल्ली यांना काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे आराखडा तथा सीमांकान तयार करून 2023-24 चालू वर्षा करीता सामूहिक अंतर्गत खंड क्र 675मधील बांबूची स्वत तोड करण्याबाबाबत तांत्रिक मदत करण्याबाबत निवेदन देण्यात आले सदर निवेदनात अशे म्हंटले आहे की”ग्रामसभा पोयरकोठी यांनी सुक्ष्म आराखडा वा सिमांकन तयार करून आपल्या […]