तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्यावतीने गावोगावी सभा घेऊन देण्यात येत आहेत बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे धडे या मोहीम अंतर्गत कोपरआली मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना गावोगावी सभा घेऊन बीज प्रक्रिया करण्याचे फायदे तसेच उगवण क्षमता चाचणी करण्याची आवश्यकता तसेच खरीप हंगाम पूर्व शेतीची मशागत आणि बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी मोजा अंबेला तसेच कोळसापुर येथे शेतकरी सभा घेऊन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी श्री कांबळे यांनी शेतकऱ्यांना विविध प्रक्रिया व पट्टा पद्धत भात लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली व खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर करावयाच्या सर्व मशागती बाबत शेतकऱ्यांना जनजागृती केली यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते त्यांनी कृषी विभागाद्वारे सुचवलेल्या सर्व उपायोजना करण्याचे आश्वासन दिले
Related Articles
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे, दि.२८(जिमाका) :- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!” या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]
जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. पुरुष विभागात जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले तर बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात बाजी मारली. पश्चिम […]
राशन कार्ड रद्द होणार पहा सविस्तर माहिती
जे नागरिक शासनाच्या निकषामध्ये बसणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मोफत राशन होय. जे गरीब नागरिक आहेत किंवा जे नगरीक मोफत धान्य योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा या योजनेचा हेतू होता. […]