मुलचेरा: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वर्ष २०२४-२५ अंतर्गत ‘अन्नधान्य पिके फ्लेक्झी’ या घटकांतर्गत तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय पाइपलाइनसाठी अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयाकडे २५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पंप संच घेण्यासाठी निकषानुसार ५० टक्के किवा १० हजार रुपये देण्यात येणार आहे. यासाठीही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना पाईपसाठी अनुदान दिले जाते. ५० टक्के किंवा ५० रुपये प्रति मीटरसह डीपीई पाईप, ३५ रुपये प्रति मीटर पीव्हीसी पाईप किंवा जास्तीत जास्त १५ हजार रुपये लाभार्थीना मिळणार आहेत.
प्रक्रिया संचसाठी हे आहेत निकष
■ शेतकरी उत्पादक संघ / कंपनी एफपीओ / एफपीसीसाठी बीज प्रक्रिया संचसाठी उत्पादित बियाणांवर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांना बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे.
■ यंत्रसामग्री बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. ■ शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम / यंत्र यासाठी निकष-
बियाणास मोठ्या प्रमाणावर बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बीज प्रक्रिया ड्रम / यंत्र खरेदीसाठी ८ हजार रुपये प्रतियुनिट किंवा किमतीच्या ५० टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.
गोदाम बांधकामासाठी अनुदान
■ अन्नधान्य साठवणुकीसाठी २५० मे. टन क्षमतेसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडित असून, इच्छुक अर्जदार राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करू शकतात.