ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ई-श्रम कार्डची KYC करून देतो खात्यात 3000 रुपये येणार अशे म्हणाऱ्या व्यक्तीवर होणार दंडात्मक कारवाई तहसिलदार चेतन पाटिल मुलचेरा

मुलचेरा:-

भारत सरकारच्या वतीने ई-श्रम कार्ड  माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्यासाठी ई श्रम योजना विकसित केली आहे.

जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

मात्र मुलचेरा तालुक्यात काही गावांमध्ये ऑनलाइन कामे करणारे व्यक्ती येऊन अफवा पसरवून दिले आहे की श्रम कार्ड ला E-KYC केलं तर 3000 रुपये मिळणार अश्या संचालकांवर दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल. शासनाचा वतीने परिपत्रक अजूनही आलेले नाही. जनतेनी या अफवांवर बळी पडू नये अशे आव्हाहन तहसिलदार चेतन पाटील यांनी केले आहे