ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारू विक्री व वाहतुकी संदर्भात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कारवाई करत तब्बल ९३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागांमध्ये वाहनांची तपासणी करत असताना त्याचबरोबर अवैधपणे सुरू असलेल्या हातभट्ट्या व अवैधपणे सुरू (Dhule) असलेली मद्यविक्री अशा विविध प्रकारच्या कारवाया करीत जवळपास ७६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अजून पुढे देखील हि कारवाई सुरूच राहणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान जवळपास ५८ आरोपींना ताब्यात देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व एकंदरीत कारवाईदरम्यान ९३ लाख २ हजार ९७८ रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे.