गडचिरोली,(जिमाका),दि.25: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी (MPSC) पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000 ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.01 नोव्हेंबर 2024 पासुन 28 नोव्हेंबर 2024 पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत दि.29 नोव्हेंबर 2024 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Related Articles
कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे-:तहसीलदार चेतन पाटील
मुलचेरा-: कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे असून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी समोर येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक विकास साधन्याचे आवाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सन 2023-24 अंतर्गत अतिदुर्गम,आदिवासी बहुल देवदा येथे आयोजित भव्य मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून केले.पुढे मार्गदर्शन करतानी त्यांनी म्हटले की,देशाचा […]
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी !
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय 10-10-2023 रोजी निर्गमित झाला आहे. सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी […]
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
मुंबई,:- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित […]