ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महावितरणचा पुढाकार : लकी डिजिटल ग्राहक ठरले

स्मार्ट फोन देऊन पाच वीज ग्राहकांचा गौरव

मुलचेरा:

           तालुक्यातील महावितरण विजेचा बिल भरणा नियमित ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी महावितरणतर्फे प्रत्येक वीज वितरण कंपनी उपविभागातील ५ ग्राहकांना लकी डिजिटल ग्राहक योजना एप्रिल २०२५ अंतर्गत पुरस्कार देण्याचे ठरविले होते. निरंजन कुंडू कोपरअल्ली,बकुल मणींद्र ढाली विवेकानंदपुर,काबिता बाबू मंडल विश्वनाथनगर,साईबा गि गर्तुलवार कोपरअल्ली ,पवन राजेन रॉय देशबंधूग्राम या पाच ग्राहकांना श्री.शिरिष रामदास डोंगरे उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क.म.उपविभाग मुलचेरा यांच्या हस्ते स्मार्ट मोबाईल व स्मार्ट वॉच देऊन सत्कार करण्यात आला.सदर विजेत्यांनी जानेवारी-मार्च २०२५ चे महावितरणचे इलेक्ट्रिक बिल ऑनलाईन पद्धतीने त्वरित भरले, त्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी महावितरण चे कर्मचारी उपस्थित होते.