12वी मध्ये नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका. आयुष्यात अनेक संधी तुमच्यासाठी अजून ही खुल्या आहेत. खचून न जाता, सकारात्मक विचार ठेवा.
पुनर्मूल्यांकन/पुनर्तपासणी :
12वी च्या परीक्षेत नापास झालात व तुम्हाला गुणांबाबत शंका असेल तर रिचेकिंग म्हणजेच पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करता येतो. यासाठी प्रति विषय 300 रुपये शुल्क आकारले जाते.
अर्ज महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच उपलब्ध होतो.
पुरवणी परीक्षेचा अर्ज भरा :
जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेला आता नापास झालेले विद्यार्थी पुन्हा बसू शकतात. ही परीक्षा पास झाल्यास पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी अर्ज प्रक्रिया 20 मे नंतर सुरू होईल.
परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2025 मध्ये जाहीर होईल. कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा बोर्डाच्या संकेतस्थळावर Supplementary Exam साठी अर्ज करावा लागेल.
तुम्ही परीक्षेत नापास झाले म्हणजे आयुष्यात नापास झाले असे होत नाही. पुन्हा एकदा परीक्षेला बसा अथवा पर्यायी मार्गाचा विचार करा. पुढील भविष्यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करा.