गडचिरोली,(जिमाका)दि.21: जिल्यातील बियाणे, खते व किटकनाशके यांच्या खरेदी विक्री, गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष, खरीप हंगाम २०२५ करिता १५ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ व रबी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात आलेला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ०७:०० या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५६९०१६९ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तक्रार किंवा अडचण [email protected] /[email protected] या मेल द्वारे पाठविता अथवा नोंदविता येईल असे आवाहन कृषि विकास अधिकारी कु. किरण खोमणे यांनी शेतकरी, कंपनी प्रतिनिधी, बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते व सर्व नागरिकांना केले आहे.
जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर प्रत्येकी १ असे जिल्ह्यात एकूण १३ भरारी पथके स्थापन केलेले आहे. बोगस बियाणे, खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द करण्यात येईल व कायदेशीर कार्यवाही केली जाईल. यासंबंधित कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे. बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे, तसेच युरिया खत ज्यादा दराने विक्री केल्याचे व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.