ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

धान खरेदीसाठी मुदतवाढ

गडचिरोली दि. २१: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक (उच्च श्रेणी) आणि उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) यांच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२४-२५ करिता अहेरी उपविभागात धान खरेदी केंद्रांवर सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेची मुदत ३१ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, आसरअल्ली, अमरादी, अंकीसा, वडधम, जाफ्राबाद, बामणी, पेटिपाका आणि विठ्ठलरावपेठा या नऊ खरेदी केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित ठिकाणी टिडीसी गोदाम, एपीएमसी गोदाम, महात्मा गांधी गोदाम, ग्रामपंचायत गोदाम, वनविभागाचे गोदाम, कृषी गोदाम आणि शासकीय आश्रमशाळेतील गोदामांमध्ये धान खरेदी सुरू आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनच धान विक्रीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. नोंदणीसाठी ई-पिक पत्रक (सातबारा, नमुना ८ अ), आधारकार्ड, बँक पासबुक, ई-केवायसी तसेच संमतीपत्र आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी हे सर्व कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करून शासनाच्या आधारभूत दराने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळ, अहेरीचे उप प्रादेशिक व्यवस्थापक बी. एस. बरकमकर यांनी केले आहे.