ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ग्राम कोष समितीचा स्तुत्य उपक्रम चुटूगुंटा चक येथे वाचनालयाचे उदघाटन तहसिलदार चेतन पाटील यांचे हस्ते

मुलचेरा-: जागतिक पर्यवरण दिनाचे औचित्य साधून मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा चक येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर कार्यक्रमांतर्गत ग्राम कोष समितीमार्फत तयार झालेले सुसज्ज शहीद वीर बाबुराव शेडमाके वाचनालयाचे उदघाटन तालुक्याचे तहसिलदार चेतन पाटील यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मंडळ अधिकारी अरुण नागरगोजे, ग्राम महसूल अधिकारी रितेश चिंदमवार, रोहित कोडापे सहाय्यक कृषी अधिकारी, महसूल सहाय्यक रुपेश झाडे उपस्थित होते. सदर वाचनालयाचया वाचनालयाच्या उदघाटणासोबत फार्मर आय डी , संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरी आदेश चे वितरण करण्यात आले.सदर शिबिराच्या यशस्विततेसाठी स्थानिक महसूल सेवक, सेतू केंद्र चालक, यांनी सहकार्य केले