सिरोंचा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा स्मारक परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. पद्मा भोगे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार पेंटा रामा तलांडी, नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्यासह विद्यार्थी, आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पारंपरिक नृत्य सादर केले. नृत्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती व परंपरेचे सुंदर दर्शन घडले. यावेळी आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती व अस्मिता जपण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.





