ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विशेष माहिती

रेशन कार्डचा SRC नंबर ऑनलाईन असा काढा | What is SRC Number in Ration Card Maharashtra ?

विशेष माहिती :-

महाराष्ट्र शासनामार्फत सतत नवनवीन बदल केले जातात मग ते बदल आधारकार्ड संबंधित असतील, मतदानकार्ड संबंधात असतील किंवा राशन कार्ड संबंधीत असतात. अश्याच प्रकारचा बदल मागील वर्षी रेशनकार्डमध्ये करण्यात आला. जुने रेशन कार्डच्या क्रमांकाऐवजी नागरिकांना १२ आकडी SRC NUMBER क्रमांक देण्यात आला. त्या १२ अंकी SRC क्रमांकामधे एका कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली. तसेच प्रत्येक गावातील राशन दुकानदारला एक POS MACHINE देण्यात आली ज्यामध्ये नागरिकांना देण्यात आलेला १२ अंकी SRC क्रमांक टाकल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची माहिती तसेच त्या कुटुंबाला भेटणारे एकूण रेशन आणि पोचपावती सुद्धा नागरिकांना देण्याची सुविधा करण्यात आली.

रेशन कार्ड किती प्रकारचे असतात? (Types of Ration Card in Maharashtra)

  1. AAY अंतोदय अन्न योजना ( पांढरे राशन कार्ड ) :- AAY म्हणजेच Antyodaya Anna Yojana यामध्ये जे नागरीक दारिद्र रेषेखाली मोडत नाहीत म्हणजेच ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे अश्या नागरिकांसाठी शासनामार्फत पांढरे राशन कार्ड दिले जाते.
  2. BPL ( पिवळे राशन कार्ड ) :- BPL म्हणजेच Below Poverty Line यामध्ये जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडतात म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खूपच कमी आहे अश्या कुटुंबातील व्यक्तीला शासनमार्फ़त पिवळे रेशन कार्ड दिले जाते.
  3. APL ( केशरी रेशन कार्ड ) :- APL म्हणजेच Above Poverty Line यामध्ये जे नागरिक दारिद्र रेषेच्या थोडेवर असतात म्हणजेच ज्यांची परिस्थती बऱ्यापैकी असते अश्या नागरिकांना या प्रकारचे रेशन कार्ड देण्यात येते.
  4. AY रेशन कार्ड :- AY म्हणजेच Annapoorna Yojana

    रेशन कार्डचे फायदे (Benefits Of Ration Card)

    • रेशन कार्डमुळे तुम्हांला शासनाकडून अन्न पुरवठा केला जातो ज्यामध्ये गहू, तांदूळ,साखर,डाळ इत्यादी वस्तू दिल्या जातात ज्यामुळे गरीब कुटुंबाचे उदर्निवाह होत असतो.
    • रेशन कार्डमुळे बऱ्याच शासकीय योजनेचा लाभ घेता येतो.
    • जे लोक गरीब असतात त्यांना बाजारातून अन्न धान्य महागड्या भावाने आणे परवडत नाही पण रेशन कार्डमुळे शासनामार्फत त्यांना कमी भावात अन्न धान्य पुरवठा केला जातो.
    • रेशन कार्डमुळे बऱ्याच कुटूंबाना २ वेळेसचे जेवण भेटते.
    • दारिद्र रेषेखालील नागरिकांना रेशन कार्डचा खूप फायदा होतो.

      How to Find Maharashtra Ration Card SRC Number

      • सर्वप्रथम रेशन कार्डचा RATION CARD SRC NUMBER आपल्याला माहित नसेल तर त्यासाठी आपल्याला प्ले-स्टोरवरून Mera Ration नावाचे अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करायचे आहे.
      Ration Card Android Application
      • Mera Ration अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर काही परमिशन allow कराव्या लागतील जसे की location त्यानंतर डॅशबोर्डवर तुम्हांला बरेच पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्हांला Know Your Entitlement या पर्यायांवर क्लिक करायचे आहे.
      • Know Your Entitlement या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे तुम्हांला रेशन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक टाकायचा असतो पण तुम्हाला १२ अंकी SRC NUMBER माहित नसल्यामुळे तुम्हांला आधार क्रमांक टाकून 12 DIGIT RATION CARD चा SRC NUMBER मिळवण्यासाठी सबमिट वरती क्लिक करायचे आहे.
      • त्यानंतर तुम्हांला खालीलप्रमाणे १२ अंकी रेशन कार्डचा एसआरसी क्रमांक भेटून जाईल.
      12 Digit Ration Card Src Number