ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात डिजिटल प्रशासनाला नवी गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध डिजिटल सेवा व योजनांचा शुभारंभ

महाराष्ट्रात डिजिटल प्रशासनाला नवी गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध डिजिटल सेवा व योजनांचा शुभारंभ

 

आरटीएस 2.० अंतर्गत ७४ सेवा, महा-डीबीटी 2.० मधील २४ योजना आणि मैत्री 2.० अंतर्गत ७६ सेवांचा समावेश

 

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या विविध योजना आणि सेवांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी विभागांतर्गत विविध डिजिटल सेवा व योजनांचा शुभारंभ करण्यात आला.

 

या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने अधिक सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार असून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

 

शुभारंभ करण्यात आलेल्या प्रमुख सेवा व योजना पुढीलप्रमाणे :

 

1. आरटीएस 2.० : नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ७४ सेवांचा शुभारंभ.

2. महा-डीबीटी 2.० : विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी २४ योजनांचा समावेश.

3. मैत्री 2.० : उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी ७६ सेवांची उपलब्धता.

4. महा-उपलब्धी : निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सुविधा.

5. स्टेट-सेंटर सीएमएस : शासकीय पत्रव्यवहारावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी कॉरस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टिम.

6. जीक्यूएमएस 2.० : शासकीय निवासस्थानांच्या व्यवस्थापनासाठी गव्हर्नमेंट क्वार्टर मॅनेजमेंट सिस्टिम.

7. महाराष्ट्र आधार डॅशबोर्ड : विविध प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल माहिती व देखरेख प्रणाली.

 

या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राज्य सरकारच्या या डिजिटल उपक्रमांमुळे शासकीय सेवांचे सुलभीकरण, नागरिकांचा वेळ वाचविणे, योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणणे आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही ऑनलाइन माध्यमातून विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

header