राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा (competitive examinations) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी (Study) करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (recruitment process) मार्फत पद भरतीच्या संख्या मध्ये मोठी वाढ केलेली आहे. त्यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत प्रामुख्याने मोठी वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी कडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात (MPSC Recruitment) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 161 पदांचा समावेश होता मात्र शासनाकडून अन्य पदांची मागणी पत्र एमपीएससी ला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पद भरती प्रक्रियेमध्ये नव्याने समाविष्ट (MPSC vacancy incrased) करण्यात आलेली आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती पाहुया.
वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 33, पोलीस उपअधीक्षक गट ‘अ’ संवर्गाची 41, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ‘अ’ संवर्गाची 47, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 14, उपनिबंधक सहकारी संस्था गट ‘अ’ संवर्गाची दोन पदांची भरती वाढवण्यात आली आहे.
MPSC वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय
राज्य सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी वयोमर्यादा शिथिल करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. मात्र यात बदल व्हायला हवा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत.
अपात्र ठरवून अन्याय
या शासन निर्णयानुसार 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 31 डिसेंबर 2022पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातींच्या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली. मात्र 17 डिसेंबर 2021नंतर कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. 17 डिसेंबर 2021नंतर कमाल वयोमर्यादा ओलांडलेले अनेक उमेदवार आहेत. शासनाच्या निर्णयामुळे अडीच वर्षे अधिक वय असणारे उमेदवार परीक्षेला पात्र ठरत आहेत.
परीक्षा पद्धतीतही बदल
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आधीच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, त्याचे निकाल लवकर लागत नाहीत. आता तर बहुपर्यायी परीक्षा पद्धती बदलून वर्णनात्मक करण्यात येत आहे. कोविड काळामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांची वाया गेली. परीक्षा पद्धतीत सातत्य नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात मागील वर्षी स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्याही केली होती. अशा विविध समस्या असताना त्यात कमाल वयोमर्यादेचा कालावधी बदलण्यात आला आहे. आता यासंदर्भात हे सर्व विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.