ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

मृत कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना आयुष्यभर मिळणार पैसे, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!!

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे.. कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते.. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत असला, तरी संबंधित कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांचे काय? कमावत्या मुलाच्या मागे त्याच्या आई-वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता..

ही बाब लक्षात घेऊन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. याबाबत कामगार व रोजगार मंत्रालय (Labour and Employment Ministry), तसेच भविष्य निर्वाह निधी संघटनेने ट्विट करण्यात आले आहे.

आई-वडिलांना आजीवन पेन्शन

संघटनेच्या ट्विटनुसार, ‘ईपीएस-95’ योजनेतंर्गत ‘पालक व वारसांना फायदा’ या शिर्षकाखाली योजनेत महत्वाचा बदल केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आता कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला जेवढे मासिक पेन्शन मिळते, तेवढेच मासिक पेन्शन कर्मचाऱ्याच्या पालकांना, आई-वडिलांना तेही आजीवन देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पालकांना, आई-वडिलांना मोदी सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विधवा पत्नीसोबतच कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांनाही या निर्णयाचा फायदा पोहचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्याची विधवा पत्नी व मुलांनाही या योजनेतंर्गत लाभ दिला आहे.

विशेष म्हणजे, कर्मचाऱ्याने वारस म्हणून आई-वडिलांचे नाव जोडलेले नसले, तरी ‘ईपीएस-95’ (EPS-95 scheme) योजनेतंर्गत विहित कागदपत्रांच्या आधारे मृत कर्मचाऱ्याच्या पालकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील कितवा हिस्सा पालकांना मिळेल, तसेच सरकार त्यात किती रकमेची भर घालणार, याबाबतची माहिती समोर आलेली नाही..