आज आपण महाराष्ट्र सरकारने काढलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना 2016 साली महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा हेतू हा गरिबाच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे व मुलगी मोठी झाल्यावर तिचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा होता. या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना एक मुलगी आहे त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये मिळतात. तर ज्या शेतकऱ्यांना दोन मुले आहेत त्यांना एका मुली पाठीमागे 25 याप्रमाणे दोन मुलीचे 50 हजार रुपये मिळतात Mazi Kanya Bhagyashri
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. यासोबतच मुलीचा किंवा तुमचा मोबाईल नंबर, मुलीचे रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, यानंतर राशन कार्ड व मुलीच्या आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक लागेल
फक्त हेच करू शकतात अर्ज
अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवे. यासोबतच तुम्हाला फक्त दोनच मुली किंवा दोनच अपत्य असणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, व तुमची मुलगी दहावी पास व 18 वर्षे पूर्ण पाहिजे व ती अविवाहित पाहिजे.
या योजनेचा अर्ज कोठे करायचा
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्या वेळेला तुम्हाला अंगणवाडीत जावे लागेल, तेथे तुम्हाला एक ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म घ्यावा लागेल. तो फॉर्म संपूर्णपणे भरुन तुम्हाला अंगणवाडीमध्ये वर दिलेले कागदपत्रासोबत सबमिट करावा लागेल. यानंतर अंगणवाडीमध्ये तुम्हाला पुढील माहिती मिळेल