ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रु. मिळणार

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवित हानी त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारमार्फत वाढ करण्यात आलेली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्यात जर एखादा व्यक्ती मृत पावल्यास अश्या व्यक्तीच्या कुटुंबीय वारसदारांना आता शासनाकडून 20 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. वनमंत्री सुधी मुनगंटीवार यांच्यामार्फत ही घोषणा करण्यात आली.

त्याचप्रमाणे गव्यांनसारख्या वन्यप्राण्यांमुळे राज्यातील विविध भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान बघता याबाबत सुध्दा नुकसान भरपाईची ( Compensation for Damage ) तरतूद करण्याचा विचार करण्यात येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मागील 3 वर्षांमध्ये म्हणजेच 2019-20 मध्ये 47, 2020-21 मध्ये 80, तर 2021-22 मध्ये 86 याप्रमाणे मानवी जीवित हानी झालेली आहे.

वाघ, बिबट्या, रानडुक्कर, गवा, अस्वल, लांडगा, हत्ती, कोल्हा इत्यादी वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसा किंवा त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील व्यक्तीस मदत देण्याच्या रकमेमध्ये शासनामार्फत आता वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी मदतीची रक्कम 15 लाख रु. होती परंतु यामध्ये वाढ करून ती रक्कम 20 लाख रु. इतकी करण्यात आलेली आहे. रक्कम दोन विभाजनामध्ये लाभार्थ्यांना देण्यात येईल. यापैकी 10 लाख रु. तात्काळ संबंधित वारसांना Cheque च्या माध्यमातून देण्यात येईल. उर्वरित 10 लाख रु. रक्कम वारसांच्या राष्ट्रीयकृत असलेल्या बँकेत व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव ( Deposit ) म्हणून ठेवण्यात येईल.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तींना कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रु. गंभीर जखमीस 1 लाख 25 हजार रु. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च शासनामार्फत देण्यात येईल. जर औषध उपचार खाजगी रुग्णालयात केल्यास 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल.

गाय बैलांचा मृत्यू झाल्यास मिळणार 70 हजा

  • वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, बैल, म्हैस यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करून आता 60 हजार रु. ऐवजी 70 हजार रु. मदत दिली जाणार आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास 10 हजार रु. ऐवजी आता 15 हजार रु मदत करण्यात येणार आहे.
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय, बैल, म्हैस यांना कायम अपंगत्व आल्यास 12 हजार रु. ऐवजी 15 हजार रु. इतकी वाढीव रक्कम देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास 4 हजार रु. ऐवजी 5 हजार रू. इतकी वाढीव मदत देण्यात येणार आहे.