|
अटल पेन्शन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात किती योगदान द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते.
- वयाच्या 18 व्या वर्षी 5000 महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी, दरमहा 210 रुपये द्यावे लागतील
- वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 376 रुपये द्यावे लागतील
- 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये दरमहा द्यावे लागतील
- 35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये दरमहा द्यावे लागतील
- 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये दरमहा द्यावे लागतील