मुंबई दि 9 : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधनामुळे भारत सरकारने दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश श्री. उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी कळविले आहे.
Related Articles
सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत -राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
मुंबई दि. 8 : “जन औषधी केंद्रांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. यामुळे गरीब नागरिकालाही औषधोपचार करुन घेणे शक्य होत आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात […]
आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे – राज्यपाल रमेश बैस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान ठाणे, दि. 28 : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, असे […]
रस्तात खड्डा की खड्डात रस्ता.. अहेरी विधानसभा क्षेत्राची गेल्या ४ वर्षात प्रचंड दुरावस्था.. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा अहेरी येतील ऐतिहासिक दसरा मोहोत्सवात जोरदार घणाघात..
अहेरी इस्टेटचा १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दसरा मोहोत्सवाला महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड ह्या राज्यातील हजारो लोकांची उपस्थिती. अहेरी इस्टेटचा १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सव काल अहेरी इस्टेटचे ६ वे राजे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांचा मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, ह्यावेळी बोलतांना राजे मनाले “दसरा” ही आपली ऐतिहासिक संस्कृती आहे, गेल्या १५० वर्षांपासून […]