मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडपातून राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. चौपाटीवर उभारण्यात आलेल्या मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चौपाटीवर उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास देखील त्यांनी भेट दिली.सण उत्सवांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे कार्य होते. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसांडून वाहतोय, असे सांगत आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
Related Articles
मोहुर्ली येथे वीर बाबुराव शेडमाके यांची शहिद दिवस साजरा
मुलचेरा :- तालुक्यात मोहुर्ली येथे २१ऑक्टोबर रोजी वीर बाबुराव शेडमाके शहिद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा कार्यक्रमाचे उदघाटन श्री तालांडे साहेब नायब तहसीलदार तहसील कार्यालय मुलचेरा यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे दिनेश पेंदाम,श्री.कुळमेथे साहेब,श्री पवन आत्राम,प्रभाकर मडावी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा यांनी शहिद वीर […]
(NMC) नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या 100 जागांसाठी भरती
NMC Nagpur Recruitment 2022 Nagpur Municipal Corporation, Under NUHM, NMC Nagpur Recruitment 2022 (NMC Bharti, Nagpur Mahanagarpalika Bharti 2022) for 100 Fire Extinguisher Posts. www.majhinaukri.in/nmc-nagpur-recruitment Advertisement जाहिरात क्र.: 590PR Total: 100 जागा पदाचे नाव: अग्निशमन विमोचक शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स […]
बंदरांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत येणाऱ्या बंदराचा दर्जा व सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच बंदरांची रस्ते, रेल्वे मार्गासोबत जोडणी करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. आज मंत्रालयात आयोजित महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाअंतर्गत येणाऱ्या बंदरांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विभागनिहाय […]