रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar hami Yojana) संपूर्ण भारतामध्ये 265 कामांचा लाभ दिला जातो. यामध्ये वैयक्तिक कामांबरोबरच संपूर्ण गावासाठी लागणाऱ्या इतर सरकारी कामांचा सुद्धा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला काम’ दिले जात होते सध्या शासनाने ‘मागेल ते काम’ असा बदल केलेला आहे.
यामध्ये तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना घेऊन त्या योजनेसाठी स्वतः काम करून दर दिवशी २५८ एवढी मजुरी प्राप्त करू शकता.
याच्या अगोदर जर तुम्ही रोजगार हमी योजनेअंतर्गत एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की एखाद्या लाभार्थ्यासाठी असणाऱ्या योजना या मर्यादित होत्या.
“Rojgar hami Yojana” कोणत्याही लाभार्थ्यांन एका योजनेचा लाभ घेतला तर त्याला दुसरी योजना सहसा भेटतच नव्हती
पण सध्या शासनाने समृद्धी बजेट योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला रोजगार हमी मधून पॅकेज स्वरूपात योजना वितरित करण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये काही योजना ग्रामपंचायत स्तरावर तर काही योजना कृषी विभागाकडून दिल्या जाणार आहेत
वैयक्तिक लाभाच्या योजना :
- सिंचन विहीर
- गांडूळ खत प्रकल्प
- फळबाग लागवड
- शेततळे
- बांधावरील वृक्ष लागवड
- गुरांचा गोठा
- शेळी पालन शेड
- कोंबड्यांचे शेड
अशाप्रकारच्या बऱ्याच योजना तुम्ही वैयक्तिक लाभासाठी घेऊ शकता.
सार्वजनिक लाभाच्या योजना :
- सार्वजनिक विहीर
- शाळेसाठी शौचालय बाथरूम
- अंगणवाडीसाठी लागणाऱ्या विविध योजना
- सार्वजनिक वृक्ष लागवड
- पाणी बंधारे
- पानंद रस्ते
सध्या प्रत्येक गावातून 2022-23 या वर्षाचं समृद्धी बजेट काढण्याचं काम चालू आहे. प्रत्येक गावातून कामांची मागणी केली जात आहे.
जर आपल्याला वरीलपैकी किंवा याव्यतिरिक्त रोजगार हमीद्वारे असलेल्या कोणत्याही कामाचा लाभ घ्यावयाचा असेल तर आपल्याच गावातील ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग किंवा पंचायत समिती यांना भेट देऊन आपण संपूर्ण माहिती मिळवू शकता.
हे ही लक्षात ठेवा :
वरील योजना घेत असताना त्या योजनेसंबंधी शासनाने दिलेले पात्रता नियमांमध्ये तुम्ही बसायला हवं.
प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे पात्रता नियम नमूद केलेले आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- जॉब कार्ड
- ग्रामसभेचा ठराव
- ग्रामपंचायत कृती आराखडा
- याव्यतिरिक्त संबंधित योजनेसाठी लागणारी इतर कागदपत्र.