ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

संजय गांधी निराधार योजना 2022 संपूर्ण माहिती

शासनाच्यावतीने जनसामान्यांसाठी विविध योजना चालविण्यात येतात. त्यामधील निराधारांची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत 65 वर्षाखालील निराधार पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ, घटस्फोटीत महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला इत्यादी विविध वर्गातील नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा मदत दिली जाते.

या योजनेच्या माध्यमातून वरील नमूद व्यक्तींना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहू नये. या अनुषंगाने निराधार योजनेअंतर्गत सरासरी 900 रुपयापासून 1500 रुपयेपर्यंत दरमहा आर्थिक मदत दिली जाते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2022

आपण आजच्या या लेखांमध्ये संजय गांधी निराधार योजना काय आहे ? या योजनेसाठी कोण पात्र असतील ? संजय गांधी निराधार योजनेच्या अटी व शर्ती काय असतील ? संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज कसा व कुठे करावा ? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

योजनेचे नाव संजय गांधी निराधार योजना
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी वर्ग अपंग, निराधार, विधवा, अनाथ इत्यादी दारिद्र्यरेषेखाली नागरिक
एकूण लाभ रक्कम मासिक 900 ते 1500 रु.
अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/
Sanjay Gandhi Niradhar Yojana Overview

संजय गांधी निराधार योजनेबद्दल थोडक्यात माहिती :

मित्रांनो, तुमच्या गावातील एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून तुम्ही शब्द ऐकला असेल की, संजय गांधी, इंदिरागांधीचे, किंवा निराधारचे पैसे आम्हाला दर महिन्याला मिळतात. याचाच अर्थ असा की, गावातील निराधार व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना या योजनेमध्ये समाविष्ट केलं जातं. जे लोक निराधार असतील त्यांना शासनाकडून एक आर्थिक मदत दरमहा देण्यात येते. ज्यामध्ये कमीत-कमी 900 रु. तर जास्तीत-जास्त 1500 रु. इतकी रक्कम दिली जाते.

संजय गांधी निराधार योजना पात्र लाभार्थी

Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility

  • अपंगव्यक्ती, अंधव्यक्ती, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद या प्रवर्गातील स्त्री किंवा पुरुष
  • कॅन्सर, टीबी (TB) पक्षघात (Paralysis) एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे त्या व्यक्तींना दैनंदिन कामकाज करता येत नसेल असे पुरुष किंवा महिला
  • अनाथ मुले ( 18 वर्षाखालील )
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
  • निराधार महिला, निराधार विधवा महिला, शेतमजूर महिला
  • वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी
  • 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री

संजय गांधी निराधार योजनेसाठीच्या अटी व शर्ती

Niradhar Yojana Terms & Conditions

  • एखादी महिला विधवा असेल; पण त्या महिलेच्या नावाने शेतजमीन असल्यास या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीत.
  • अर्जदार व्यक्तीविरुद्ध असतील व त्यांच्या उत्पन्नाचा साधन मोठ्या प्रमाणावर असेल, तर अशा अर्जदारांनासुद्धा या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही.
  • इन्कम टॅक्स रिटर्न ( income tax return ) भरणारी व्यक्तीसुद्धा या योजनेअंतर्गत पात्र होऊ शकत नाही.
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही पर्याय नसावा.
  • अर्जदार किमान 15 वर्षासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 65 वर्षाखाली असावे.

संजय गांधी निराधार योजना भौतिक तपासणी

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती हयात आहेत का ? त्याचप्रमाणे लाभार्थी व्यक्ती परगावी राहतात का ? यासाठी दरवर्षी गावाच्या संबंधित तलाठ्यांमार्फत 01 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत आवश्यक ती कागदपत्रे लाभार्थी व्यक्तीकडून गोळा केली जातात.

हे सुध्दा वाचा : राष्ट्रीय वनश्री योजना काय आहे ? आता ज्येष्ठ नागरिकांना व अपंग व्यक्तींना मोफत उपकरणे मिळणार

कागदपत्रांमध्ये हयातिचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांचा समावेश असतो. कोणतेही परिस्थितीमध्ये लाभार्थी जर अपात्र आढळून येत असेल; तर त्याचे कारणमीमांसा त्या लाभार्थ्यास कळवून त्यांचा लाभ त्वरित बंद करण्यात येतो.

संजय गांधी निराधार योजना समाविष्ट जाती

  • खुला
  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • विमुक्त जाती
  • भटक्या जमाती
  • विशेष मागास प्रवर्ग
  • इतर मागास प्रवर्ग

संजय गांधी निराधार योजनेचे फायदे

Benefits of Sanjay Gandhi Niradhar Yojana

  • योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना दरमहा 900 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य म्हणून शासनाकडून मदत दिली जाते.
  • एका कुटुंबात एकाच योजनेचे जास्त लाभार्थी असल्यास अशा कुटुंबाला स्वतः दरमहा रक्कम थोडीफार कमी करून आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • आर्थिक मदत झाल्या करणारे राज्यातील व्यक्ती सशक्त व आत्मनिर्वा बनतील.
  • सरकार करून मदतीचा हात मिळाल्यामुळे निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी व उपजीविकेसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents

  • आधारकार्ड ( ओळखीचा पुरावा म्हणून कोणतेही 1 कागदपत्र )
  • अर्जदाराचा फोटो
  • मतदान ओळखपत्र
  • ग्रामसेवक, तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्यामार्फतचा रहिवाशी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
  • अपंगाचे प्रमाणपत्र ( असल्यास )
  • अनाथ असल्याचा दाखला
  • काही परिस्थितीमध्ये इतर कागदपत्रसुद्धा लागू शकतात

अर्ज कोणाकडे करावा लागेल ?

संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज आपल्याला संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय नायब तहसीलदार साहेब यांच्याकडे करावा लागतो. या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये चौकशी करू शकता.

संजय गांधी निराधार योजना अर्ज प्रक्रिया

Sanjay Gandhi Niradhar Yojana application process

संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्जदार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. म्हणजे ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी एका पद्धतीने. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी आपल्या गावातील तलाठी, ग्रामसेवक यांना संपर्क करावा किंवा जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन नागरिकांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन अर्ज

Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Application

  1. मित्रांनो, जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल, तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म ऑनलाईन घरबसल्यासुद्धा भरू शकता.
  2. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/ या वेबसाईट वरती यायचं आहे.
  3. त्यानंतर नवीन नोंदणी करून तुमची प्रोफाइल माहिती भरून घ्यायची आहे.
  4. नवीन नोंदणी व प्रोफाइल माहिती भरल्यानंतर तुमचा युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
  5. लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची मातृभाषा निवडून घ्यायची आहे. जेणेकरून फॉर्म भरतेवेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  6. मातृभाषा निवडल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या पर्यायावर क्लिक करायच आहे.
  7. त्यानंतर एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल, तो फॉर्म काळजीपूर्वक वाचून संपूर्ण भरून घ्यायचा आहे व शेवटच्या टप्प्यामध्ये आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  8. सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करून ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्जाची व पेमेंट केलेली प्रत झेरॉक्स काढून ठेवायची आहे.
  9. अर्जावर आलेल्या एप्लीकेशन नंबरच्या साह्याने तुम्ही तुमच्या अर्जाची सध्यास्थिती पाहू शकता.

महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना काय आहे ?

राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक पेन्शन योजना आहे. ज्या योजनेअंतर्गत निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत दिली जाते.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा किती आर्थिक मदत मिळेल ?

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार 900 ते 1500 रुपये आर्थिक मदत मिळते.

अपंग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा मिळतो का ?

हो नक्की मिळतो, त्यासाठी अपंग व्यक्तीकडे कमीत कमी 40 टक्के अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

संजय गांधी निराधार योजनेसाठी कोण पात्र असतील ?

65 वर्षाच्या आतील निराधार व्यक्ती ज्यामध्ये अपंग, विधवा, विधुर, अनाथ इत्यादींचा समावेश असेल व अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतील.

संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्जदार अर्ज करू शकतात. या संदर्भातील सविस्तर माहिती वरील लेखांमध्ये देण्यात आली आहे.