गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नवीन पोस्ट कार्यालय साठी निवेदन सादर

मुलचेरा :-
तालुक्यातील भवानीपूर हे गाव १५०० ते २००० च्या लोकसंख्येने बसलेला गाव आहे.या गावात पोस्ट कार्यालय नसल्याने पोस्ट अंतर्गत येणाऱ्या योजनाचे लाभ घेण्यासठी लांब अंतरावर असलेला खुदिरामपल्ली या गावातील पोस्ट कार्यलय येथे जाऊन लाभ घ्यावा लागते .विशेष म्हणेजे भवानीपूर ते खुदिरामपल्ली जाण्यास कमी प्रमाणात बसेस चालत असल्यामुळे कधी पायदळ,दुचाकी या पद्धतिने प्रवास करत त्रास सहन करावा लागते.भवाणीपुर येथे नवीन पोस्ट कार्यालय स्थापन झाल्यास गावातील समस्या सुटतील.
यामुळे भवाणीपुर येथील पोलीस पाटील, ग्राम पंचायत उपसरपंच सुंदरनगर संजीत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट कार्यलय चामोर्शी येथे कार्यालय निरीक्षक श्री किशोरजी पारडे यांना निवेदन दिले.
या प्रसंगी गावातील नागरिक उपस्थित होते.